Maharashtra Budget 2019 : 'अर्थमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अर्थसंकल्प आधीच फुटला'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असाताना विरोधकांनी थांबवला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला.

मुंबई: विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असाताना विरोधकांनी थांबवला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला.

विधानपरिषदेत अर्थसंकल्पीय भाषण थांबवण्याची वेळ आली असून सभापतींनी गट नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास यावर भारतीय नागरिकांचा विश्वास असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले आणि अर्थसंकल्प मांडण्यास सुरवात केली.

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला असून राज्यात अनेक गावांत दुष्काळ जाहीर करून, मदत पुरविण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचवेळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अर्थसंकल्पाच्या सर्व माहितीचे ट्विट करण्यात येत आहेत. यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषण थांबविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leaders accused Maharashtra budget leaked on twitter