मविआची 'महाराष्ट्र एक्‍सप्रेस' अधिक गतिमान होणार; पदवीधर निकालानंतर कॉंग्रेसनेत्याची प्रतिक्रीया

तुषार सोनवणे
Friday, 4 December 2020

निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्‍सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

 
मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्‍सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - 'पालकमंत्र्यांचा तुघलकी निर्णय रद्द करा'; पोईसर नदीरुंदीकरणप्रश्नी भाजपचे आंदोलन 

विधान परिषद निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण 24 जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्‍सप्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्‍सप्रेस' देखील सुसाट होईल. असेही ते यावेळी म्हणाले. 

 

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट आहे. 
- अशोक चव्हाण,
सार्वजनिक बांधकाम मंत्री. 

----------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Our government will work faster Ashok Chavans reaction after the maharashtra graduate constituency elections