esakal | सुशांतसिंग प्रकरणी आमचा तपास योग्यच; आयुक्तांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतसिंग प्रकरणी आमचा तपास योग्यच; आयुक्तांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब
  • सुशांतसिंग राजपूतची हत्या नसुन, आत्महत्या असल्याचा आमचा दावा होता,
  • अखेर आमचाच तपास योग्य असल्याचा निर्वाळा एम्सने दिला.

सुशांतसिंग प्रकरणी आमचा तपास योग्यच; आयुक्तांचा मुंबई पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या विविध शक्यतांबाबत सुरू असलेल्या तपासावर अखेर पडदा पडला असुन, ही हत्या नसुन, आत्महत्या असल्याचा आमचा दावा होता, आणि अखेर आमचाच तपास योग्य असल्याचा निर्वाळा देखील एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालात नमुद केल्याचे मत पोलीस आयुक्त परम्बिर सिंग यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे याप्रकरणातील अतिम साक्ष म्हणून सिद्धार्थ पिठाणीची साक्ष नोंदविण्याची तयारी सीबीआयने सुरुवात केली आहे.

'दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस'; संजय राऊतांची रामदास आठवलेंवर सडकून टीका

एम्सचा अहवाल म्हणजे मुंबई पोलिसांची नाहक बदनामी करणा-यांना चपराक असल्याची चर्चा सध्या मुंबईतील पोलिसांमध्ये आहे. याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले, आमच्याकडे एम्स रुग्णालयाकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. मात्र, वृत्त वाहिन्यांना या अहवालाची माहिती झाली आहे. या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना आपल्या तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच तेथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालाने हे सिद्ध केले की आम्ही खरे आहोत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांनी व्यवस्थित हाताळले. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी अनेक गंभीर प्रकरणे व्यवस्थित हाताळली आहेत. मुंबई पोलीसही अत्यंत प्रोफेशनल आहेत, आमचा आमच्या तपासावर पूर्ण विश्वास आहे. सीबीआय सुद्धा एक प्रोफेशनल तपास यंत्रणा आहे, असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे कर्करोगासारखे आजार बळावले; आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्याचबरोबर एम्सच्या डॉक्टरांच्या विशेष पॅनलकडे सुशांतच्या शवविच्छेदन व व्हिसेरा रिपोर्टच्या पुनर्पडताळणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. न्यायवैधक अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या आहे. तर दुसरीकडे गेली 60 दिवसाहुंन अधिक काळ तपास यंत्रणा याबाबत तपास करीत होत्या. मात्र त्यांना काही संशयस्पद आढळले नाही. दरम्यान, याप्रकरणी एनसीबीने बॉलिवुडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला असुन, यामध्ये आणखी मोठ्या हस्तींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यातच अभिनेत्री सारा अली खान, दिपीका पदुकोन, रकुलप्रीत यांची चौकशी तसेच बॉलीवूडशीसंबधीत  क्षितीज प्रसादच्या चौकशीतुन धक्कादायक महिती समोर आली आहे.
---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )