'दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस'; संजय राऊतांची रामदास आठवलेंवर सडकून टीका

तुषार सोनवणे
Sunday, 4 October 2020

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

मुंबई - उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. महाराष्ट्रातूनही याप्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च नमुन्यांचा नव्याने अभ्यास करणार

'2012 साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. संसद बंद पाडली होती. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळय़ांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली? रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नट्यांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशात दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे. असे संजय राऊत यांनी दै सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक, भाजपच्या हालचालींवर शिवसेनेचं लक्ष

संजय राऊत यांनी या लेखात अभिनेत्री कंगना रनौत आणि तिचे समर्थन करणाऱ्यांवरही टीका केली आहे. 'हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्म्ये उभे राहिले ते हाथरस बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य झाले. या सर्व प्रकारात अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत.' असंही राऊत यांनी म्हटले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criticism of Sanjay Raut on Ramdas Athavale