esakal | 4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?

वैयक्तिक सराव करणाऱ्या 4 हजार 200 डॉक्टर्सनी महापालिकेसाठी कोविड रुग्णाांवर उपचार करण्याची तयारी दाखवली होती.

4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : वैयक्तिक सराव करणाऱ्या 4 हजार 200 डॉक्टर्सनी महापालिकेसाठी कोविड रुग्णाांवर उपचार करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यातील फक्त 700 डॉक्टर्स या सेवेसाठी पात्र आहेत.

राज्य सरकारने 4 मे रोजी लिखीत आदेश जाहिर करुन शहरातील 25 हजार खासगी डॉक्टर्सना महिन्यातील 15 दिवस केविड सेवा करणे बंधनकार केले होते.तशा नोटीसही डॉक्टर्सना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील 4 हजार 200 डॉक्टर्सनी पालिकेला सहकार्य करण्याची तयारी दाखवली. मात्र, प्रत्यक्षात 700 डॉक्टर्सच यासाठी पात्र ठरत आहेत. उर्वरीत 3 हजार 500 डॉक्टर हे सार्वजनिक रुग्णालयात काम करत आहेत. त्यामुळे त्यांना वेगळी ड्यूटी लावता येणार नाही.

मोठी बातमी एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

मुंबईत कोविड बाधित रुग्णांची संख्या सध्याच्या वाढीच्या दरानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. अशा वेळी डॉक्टर्स कमी पडू नये म्हणून खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार होती. तसेच जे डॉक्टर्स सेवा देणार नाही त्यांची सनद रद्द करण्या बरोबरच 1898 च्या साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती. 

शहरात 25 हजार नोंदणीकृत खासगी डॉक्टर्स आहेत. मात्र, त्यातील बहूसंख्य डॉक्टर्स 55 वर्षा वरील आहेत. तर अनेक डॉक्टर्स खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयातही काम करतात. तर, दवाखान्यात असलेले डॉक्टर्स कोविडचे रुग्ण शोधण्यास एक प्रकारे मदतच करत आहेत. असा दावा डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

out of 4 thousand 2 hundred doctors only 7 hundred doctors qualifies to handle covid doctors

loading image