

Wetland
ESakal
नवी मुंबई : इस्रोने मॅप केलेल्या दोन लाखांहून अधिक पाणथळ जागांपैकी फक्त १०२ पाणथळ जागांना सरकारने कायदेशीररीत्या संरक्षण दिले आहे. म्हणजे ९९.९ टक्के ठिकाणांवर संरक्षणाचा अभाव आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या कायद्यान्वये ही धक्कादायक कबुली दिली आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.