esakal | रेल्वेचे रिझर्वेशन काउंटर्स आजपासून सुरु, कोणत्या स्टेशनवर किती काउंटर सुरु? वाचा संपूर्ण यादी...

बोलून बातमी शोधा

रेल्वेचे रिझर्वेशन काउंटर्स आजपासून सुरु, कोणत्या स्टेशनवर किती काउंटर सुरु? वाचा संपूर्ण यादी...

१ तारखेपासून रेल्वेमार्फत ज्या गाड्या चालवल्या जाणार आहेत त्याच गाड्यांचं रिझर्वेशन या आरक्षण काउंटर्सवर मिळणार आहे.

रेल्वेचे रिझर्वेशन काउंटर्स आजपासून सुरु, कोणत्या स्टेशनवर किती काउंटर सुरु? वाचा संपूर्ण यादी...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन चार पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एकीकडे केंद्राने राज्यांना आपापल्या राज्याची नियमावली स्वतः ठरविण्याचे अधिकार दिलेत. तर दुसरीकडे केंद्राकडून काही मोठी पावलं देखील उचलली जातायत. त्याचाच एक भाग म्हणजे देशातील अंतर्गत विमानसेवा सुरु करणं आणि देशांतर्गंत रेल्वे सेवा टप्प्या टप्प्याने सुरु करणं. महाराष्ट्रातही आजपासून लॉकडाऊन चार चे वेगळे नियम लागू होणार आहेत. 

अशात मोठी बातमी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. आजपासून मर्यादित स्वरूपात स्टेशनवरील रिझर्वेशन काउंटर्स सुरु करण्यात आलेत. १ तारखेपासून रेल्वेमार्फत ज्या गाड्या चालवल्या जाणार आहेत त्याच गाड्यांचं रिझर्वेशन या आरक्षण काउंटर्सवर मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे काउंटर्स मर्यादित स्वरूपात सुरु राहतील. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २५ मार्चपासून रिझर्वेशन काउंटर्स बंद आहेत. रेल्वे बोर्डाकडून एक नोटिफिकेशन काढण्यात आलंय. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आलीये. स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटरवरून देखील याबाबत माहिती दिली आहे.   

मोठी बातमी - 'माझी नोकरी तर जाणार नाही ना'? लॉकडाउनमध्ये तरुणांच्या मानसिक तणावात वाढ

मुंबईत कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर किती रिझर्वेशन काउंटर्स :

  • मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ४ काउंटर्स सुरु राहणार आहेत 
  • लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर ३ काउंटर सुरु असतील 
  • दादर स्टेशनवर २ काउंटर सुरु असतील 
  • ठाणे स्टेशनवर २ काउंटर सुरु असतील 
  • कल्याण स्टेशनवर  २ काउंटर सुरु असतील 
  • बदलापूर स्टेशनवर २ काउंटर सुरु असतील 
  • पनवेल स्टेशनवर ३ काउंटर सुरु असतील 

याचसोबत मध्य रेल्वेच्या पुणे, नागपुर, सोलापूर, भुसावळ विभागातील विविध स्टेशनवर देखील रिझर्वेशन काउंटर्स सुरु झालेत आहेत. त्याची यादी ट्विटमध्ये.   

महत्त्वाची बाब म्हणजे केवळ १ जूनपासून सुरु होणाऱ्या २०० ट्रेन्स आणि चालवल्या जाणाऱ्या राजधानी गाड्यांची तिकिटं तुम्हाला मिळू शकतात. मुंबईतील उपनगरीय रेल्वे किंवा राज्यांतर्गत कोणतीही रेल्वे, शटल्स, एक्स्प्रेस सुरु झालेल्या नाहीत. त्यांची तिकिटं मिळणार नाहीत.

मोठी बातमी - मृतदेहाला अंघोळ घालणाऱ्या 'त्या' घटनेतून तब्बल इतके जण कोरोनाबाधित! वाचा बातमी सविस्तर

दरम्यान आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ आरक्षण काउंटर्स आजपासून सुरु झालेत तिकीट कॅन्सलेशन रिफंड काउंटर्स हे २५ तारखेपासून सुरु होणार आहेत. 

रेल्वेने उचललं हे पाऊल आता रेल्वे पूर्वपदावर येतेय याचंच द्योतक मानावं लागेल. 

over the counter rail reservation starts full list on which stations how many counters will be open