मृतदेहाला अंघोळ घालणाऱ्या 'त्या' घटनेतून तब्बल इतके जण कोरोनाबाधित! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

  • 23 जणांना कोरोनाची बाधा
  •  खन्ना कंपाऊंडचे कंटेन्मेंट झोनमध्ये रूपांतर

उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी एकही रुग्ण नसलेल्या खन्ना कंपाऊंड मधील एका कुटुंबाने डॉक्टरांच्या सुचनांना पायदळी तुडवून कोरोनाबाधित मृतदेहाला आंघोळ घालून अंत्यसंस्कार केल्याची चूक केली होती. त्यामुळे या परिसरातील 23 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या भागाचे कंटेन्मेंट झोनमध्ये रूपांतर झाले आहे. 

नियम तोडून कोरोनाबाधित मृतदेहाला घातली आंघोळ, पुढे काय झालंय तुम्हीच वाचा...

या परिसरात काम करणे धोक्याचे असतानाही स्वतःचा जीव धोक्यात टाकणारे सफाई कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. ते सुरक्षित राहावेत या दृष्टिकोनातून शिवसेना शहरप्रमुख, सभागृहनेते व स्थानिक नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी 10 कर्मचाऱ्यांना पीपीई किट्सचे सुरक्षा कवच दिले आहे. 
उल्हासनगरातील खन्ना कंपाऊंड मध्ये राहणाऱ्या एका 57 वर्षीय व्यक्तीचा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान 9 तारखेला मृत्यू झाला होता. मात्र या मुलांनी डॉक्टरांच्या सुचनांना पायदळी तुडवत प्लॅस्टिकमध्ये बंदिस्त करून दिलेला त्यांच्या पित्याचा मृतदेह उघडून त्यास आंघोळ घातली. पूजापाठ करून तब्बल 70 ते 80 नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले. मात्र मृत्यू पश्चात रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्याच्या नातलगांचे व स्मशानभूमीत सहभागी असणाऱ्या नागरिकांचे स्वॅब कलेक्शन घेण्यात आले होते. त्यात प्रथम 9 नातलग पॉझिटिव्ह व त्यानंतर टप्याटप्याने ही संख्या 23 च्या घरात गेली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

काहींचे अहवाल येणे बाकी
दरम्यान संपर्कातील अद्यापही काही जणांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. येथे जाण्यास बाहेरच्या नागरिकांना बंदी आहे. मात्र रोज साफसफाई करण्यासाठी येणारे 10 कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या सर्वांना पीपीई किट्सचे कवच देण्यात आल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So many people are affected by 'that' incident of bathing the dead body! Read the news in detail