esakal | Sakinaka rape case: कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

Sakinaka rape case: कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का?, फडणवीसांचा सवाल

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबापुरीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साकीनाका भागात (Sakinaka area) टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार (rape on women) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर (women serious condition) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तुने महिलेला जखमी केले आहे.

शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी काही तासातच आरोपी मोहन चौहानला अटक केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. खैरानी रोडवर आरोपी महिलेला मारहाण करत असल्याचा पोलीस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सकाळी फोन आला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी महिला तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पीडित महिलेला लगेच जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा: रशियाच्या नकारानंतर तालिबानकडून सरकार स्थापनेचा कार्यक्रम रद्द

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. "मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का?" असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. "वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी" अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

loading image
go to top