esakal | घाटकोपर: संशयी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने केले वार
sakal

बोलून बातमी शोधा

 break up

घाटकोपर: संशयी पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने केले वार

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion) घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना घाटकोपर (ghatkopar) परिसरात उघडकीस आली आहे. घाटकोपरच्या हनुमान गल्ली नेताजी जुनी कामराज नगर परिसरात हे पती-पत्नी राहतात. मागील अनेक दिवसांपासून पती-पत्नींमध्ये शुल्लक कारणांवरून वाद (fight) व्हायचे. पत्नीच्या चारित्र्यावर (dout on character) आरोपी संशय घेत असल्याने हा वाद विकोपाला जायचा, असं पोलीस चौकशीतून समोर आलय.

दरम्यान शुक्रवारी आरोपीचं पत्नीसोबत जोरदार भांडण झालं. यावेळी राग अनावर झालेल्या आरोपीने हातातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा: 'आम्ही हार मानणार नाही', पंजशीर खोऱ्यातून अहमद मसूदची गर्जना

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. या प्रकरणी पंतनगर पोलिस अधिक तपास करतआहे.

loading image
go to top