esakal | तन्मयच्या लसीकरणावरुन वाद, देवेंद्र फडणवीसांना दिले स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

तन्मयच्या लसीकरणावरुन वाद, देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्याने लस घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. तन्मय फडणवीस हा देवेंद्र फडणवीस यांचा नातेवाईक असून त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यावरुन काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.

“४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

हेही वाचा: 'माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता...' काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

तन्मय फडणवीस याच्या लसीकरणावरुन निर्माण झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस....

तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे.