esakal | 'माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता...' काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

बोलून बातमी शोधा

किशोरी पेडणेकर

'माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता...' काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्र बिकट परिस्थितीत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम परिस्थिती सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. एकाबाजूला विरोधक खूपच आक्रमक झालेत. जास्तीत जास्त परिस्थिती कशी बिकट होईल याकडे लक्ष दिल जातय" असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय. "रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवणाऱ्याला पोलिसांनी पकडलं. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता थेट पोलीस ठाण्यात गेले. उद्देश तुमचा काहीही असेल. माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यात जावं लागतं हे दुर्देव आहे" असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

"माझ्याकडे तक्रारी आल्या की, त्या ठिकाणी मी जाते. विरोधकांना खुर्चीत बसून आरोप करायला काय?. आम्हाला विरोधकांकडून प्रशस्तीपत्र नकोय. मी अन्यायाला वाचा फोडतं आहे. मी अनेक ठिकाणी जाते हीच त्यांची पोटदुखी आहे" असे आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

हेही वाचा: रेमडेसिव्हीरचा काळबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

"टास्क फोर्सने केवळ राज्य सरकारला नाही, तर केंद्र सरकारला सूचना देणं महत्वाचं आहे. केंद्राने राज्याला दिलं तर राज्यातील जनतेला देता येईल. लसी वेळेत नाही मिळाल्या तर केंद्र बंद राहणार. टास्क फोर्सने सांगितलं आहे की ते खंड पडता कामा नये" असं पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा: अरे बापरे! महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्त

"३५ केंद्र लसीकरणा अभावी बंद झाली आहेत. केंद्राने वेगळ्या गाईडलाईन दिल्यात त्या राज्य सरकार पाळणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा स्वरूप होतं. त्यापेक्षा वेगळं स्वरूप कोरोनाचा आत्ता दिसत आहे. कुटुंब बाधित होत आहेत. लोकांचा मृत्यू होतं आहे. घराघरात मृत्यू दिसत आहे. करण नसताना गर्दी करणं कमी केलं, तर आपण कोरोनावर विजय मिळवू" असे महापौर म्हणाल्या. "लॉकडाउन नको हे अनेकांना वाटत होतं. कडक निर्बंध लावून लोकांना फरक वाटत नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे की, लॉकडाउन लावावा" असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.