esakal | मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

बोलून बातमी शोधा

 शीख संघटना सेवक जथ्था
मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सध्या संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याला मुंबई सुद्धा अपवाद नाहीय. मागच्याच आठवड्यात मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये रुग्णांना हॉस्पिटल्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. कोविडच्या गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची गरज लागते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वच भागातून ऑक्सिजनला मोठी मागणी आहे. अन्य राज्यातून रेल्वे, रस्ते, विमानाद्वारे ऑक्सजिन आणला जात आहे.

ऑक्सिजनची हीच निकड लक्षात घेऊन मुंबईत दोन शीख संघटना ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढे आल्या आहेत. या शीख संघटनांनी गरजूंना मोफत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी कॉल सेंटर सुरु केले आहे. मलबार हिल भागातील सेवक जथ्था आणि मुलुंडच्या शीख युवकांनी मोफत ऑक्सिजन सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे. रेड क्रिसेंट सोसायटीसोबत त्यांनी करार केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: कोविड केंद्राबाहेर रिक्षामध्येच आईने सोडले प्राण

"ऑक्सिजन सिलिंडर देण्याआधी रुग्णाचा रिपोर्ट आणि डॉक्टरने औषधांचं काय प्रिस्क्रिप्शन दिलय ते तपासलं जाईल" असं बलविंदर सिंग या स्वयंसेवकाने सांगितलं. "मागच्यावर्षी तीन महिने आम्ही लंगर लावला होता. पण आता ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रेड क्रिसेंट सोसायटीसोबत करार करुन लोकांची मदत करत आहोत" असे बलविंदर यांनी सांगितले.

हेही वाचा: Prime Criticare Hospital:ठाण्यात रुग्णालयाला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू

"ही मोफत सेवा आहे. प्रतिसिलिंडरमागे आम्ही रुग्णाच्या नातेवाईकांकडून ६ हजार रुपये डिपॉझिट घेणार आहोत. पण डिपॉझिटची रक्कम परत केली जाईल. फक्त आम्ही सिलिंडर देण्याआधी रुग्णाचा रिपोर्ट आणि प्रिस्क्रिप्शन तपासू" असं त्यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मंगळवारी ऑक्सिजन कॉनसनट्रेटर्स आणि लिक्विड ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी ग्लोबर टेंडर काढलं. किंमत कोट करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. "४० हजार ऑक्सिजन कॉनसनट्रेटर्स, १३२ पीएसए प्लान्ट, २५ हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन, १० लाख रेमडेसिव्हीरच्या व्हायल्ससाठी आम्ही ग्लोबल टेंडर्स काढले आहेत" असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.