जोगेश्वरीत सुरु होता ऑक्सिजनचा काळाबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्वरीत ऑक्सिजनचा काळाबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

जोगेश्वरीत ऑक्सिजनचा काळाबाजार, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई: सध्याच्या काळात ऑक्सिजनला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये ऑक्सिजन जीवरक्षक ठरत आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाया जाऊ न देता, त्याचा पुरेपूर, प्रभावी पद्धतीने कसा वापर करायचा, यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. अशावेळी रुग्णाला कृत्रिमरित्या ऑक्सिजन द्यावा लागतो. त्यामुळे ऑक्सिजनला सध्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान रेमडेसिव्हीरच्या इंजेक्शनप्रमाणे काहीजण ऑक्सिजनचाही काळाबाजार करत आहेत. दरम्यान जोगेश्वरी पश्चिम भागातून ऑक्सिजनची साठेबाजी करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज सलीम सालेह असे आरोपीचे नाव असून, तो २८ वर्षांचा आहे.

हेही वाचा: भाजपाने वादळग्रस्तांना दिलं छप्पर, 'बोलत नाही करुन दाखवतो'

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जोगेश्वरी पश्चिम भागात असलेल्या दुकानात छापा टाकला. त्या ठिकाणी आँक्सिजन सिलेंडरचा साठा करून ठेवलेला होता. या छाप्यादरम्यान गुन्हे शाखेने 28 वर्षीय फिरोज सलीम सालेह याला अटक केली आणि त्याच्याकडून 25 वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडर आणि 12 ऑक्सिजन किट जप्त केली. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. जो त्याच्याबरोबर सिलिंडर्सचा काळाबाजार करत होता.

loading image
go to top