esakal | खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...
sakal

बोलून बातमी शोधा

खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

"आम्हाला पृथीच्या दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अनेक महत्वाचे हवामान बदल जाणवले आहेत. हे बदल ओझोनच्या थरात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे घडतायत. हवेतल्या ज्या पदार्थांमुळे ओझोनच्या थराला खड्डा पडतोय असे घटक आता नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे." असं कोलोरॅडो बोल्डर युनिव्हर्सिटीमध्ये भेट दिलेल्या अंतरा बॅनर्जी यांनी म्हंटलंय. त्यामुळे यापुढे जागतिक तापमान वाढ कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे.

खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या संपूर्ण जगभरावर कोरोनाचं सावट आहे. गेल्या काही दशकांपासून माणसाने प्रगतीच्या मार्गावर चालत असताना निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केलाय. त्यामुळेच आपल्यावर गेल्या काही दशकांपासून ग्लोबल वॉर्मिंगचं,  म्हणजेच जागतिक तापमान वाढीचं संकट घोंगावतंय. जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अशात आपल्याला हवामानाचा लहरीपणा अनुभवायला मिळतोय. याच मुख्य कारण म्हणजे पृथ्वीभोवती असणारा ओझोनचा थर. गेल्या काही धसकांपासून आपल्या पृथिवीभोवती असणारा ओझोनचा थर विरळ होत चाललाय. अशात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात याच ओझोन थराबाबत एक दिलासादायक बातमी समोर येतेय. जगभरात अनेक देशांमध्ये सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन थरामध्ये चांगला बदल होताना पाहायला मिळतोय असं शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आलंय. 

Corona Case Study : मुंबईत NRI नागरिक राहतोय भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमध्ये..

"आम्हाला पृथीच्या दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये अनेक महत्वाचे हवामान बदल जाणवले आहेत. हे बदल ओझोनच्या थरात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे घडतायत. हवेतल्या ज्या पदार्थांमुळे ओझोनच्या थराला खड्डा पडतोय असे घटक आता नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे." असं कोलोरॅडो बोल्डर युनिव्हर्सिटीमध्ये भेट दिलेल्या अंतरा बॅनर्जी यांनी म्हंटलंय. त्यामुळे यापुढे जागतिक तापमान वाढ कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे.

Lockdown च्या काळात नागरिक डाउनलोड करतायत हे मोबाईल 'App'; काय आहे बरं हे ऍप्लिकेशन

पृथ्वी भोवतालचा हा थर ओझोन वायूचा असतो. जो सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यापासून मज्जाव करत असतो. तसंच या अतिनील किरणांची तीव्रता कमी करण्याचं कामही हाच ओझोनचा थर करत असतो. मात्र काही वर्षांपासून या ओझोनच्या थरात कमालीची घट झाल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली होती. याचाच परिणाम म्हणून जगात तापमान वाढत चाललं होतं. परिणामी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवांवरच्या हिमनद्या आणि हिमपर्वत वितळत चालले होते.

मात्र आता या ओझोनच्या थरात कामालाची सुधारणा होत असल्याची माहिती शास्त्रज्ञांकडून मिळतेय. एका अभ्यासानुसार ओझोनच्या घटणाऱ्या थरात सुधारणा झाली आहे. यामुळे जागतिक तापमान वाढ कमी होण्यास मदत होऊ शकते.

ozone layer is healing due to corona lockdown on earth positive impact is expected : 

loading image
go to top