P305 दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना ३५ ते ७५ लाखाची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

P305 दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना ३५ ते ७५ लाखाची मदत

P305 दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना ३५ ते ७५ लाखाची मदत

sakal_logo
By
कृष्णा जोशी

मुंबई: चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात (arbian sea) पी 305 बार्ज बुडून (P 305 barje sank) झालेल्या दुर्घटनेतील ५१ मृतदेह आतापर्यंत सापडले असून अद्याप २४ जण बेपत्ता आहेत. तर अ‍ॅफकॉन कनस्ट्रक्शनकडूनही मृतांच्या नातलगांना ३५ ते ७५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (P 305 barje sank in arbian sea dead employees family members get 75 lakh help)

दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम अद्यापही नौदल व तटरक्षक दलातर्फे सुरू आहे. नौदलाची टेहळणी विमाने अत्याधुनिक उपकरणांमार्फत तर हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उड्डाण करून भरसमुद्रात शोध घेत आहेत. त्याखेरीज नौदलाच्या युद्धनौका व स्पीडबोट देखील समुद्रात शोध घेत आहेत. ५१ पैकी ४९ मृतदेह नौदलाकडून मुंबईत आणले गेले आहेत.

हेही वाचा: नौसैनिकानेच सहकाऱ्याच्या पत्नीवर केला बलात्कार

अ‍ॅफकॉनकडून मदत जाहीर

या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील शिल्लक कालावधीतील दहा वर्षांपर्यंतचा पगार तसेच विमा रक्कम त्यांच्या नातलगांना दिली जाईल. ही रक्कम सुमारे ३५ ते ७५ लाखांपर्यंत असेल, असे अ‍ॅफकॉन न्स्ट्रक्शनतर्फे जाहीर करण्यात आले आहे. मृतांच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट उभारण्यात येईल व त्याद्वारे त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. तर या अपघातामुळे मानसिक आघात झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली जाईल, असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top