तुम्हीच तुमच्या लहानग्यांना देतायत 'डायबिटीस'सारखा भयंकर आजार, असा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मुंबई: हळूहळू राज्यात उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांचं सर्वात आवडतं पेयं म्हणजे फळांचे ज्युसेस. बाजारात निरनिराळ्या कंपन्यांचे रेडिमेड ज्यूस उपलब्ध असतात. मात्र हेच ज्युसेस तुमच्या लहान मुलांसाठी आणि तुमच्यासाठी अत्यन्त धोकादायक आणि हानिकारक आहेत.

मुंबई: हळूहळू राज्यात उन्हाळा जाणवायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांचं सर्वात आवडतं पेयं म्हणजे फळांचे ज्युसेस. बाजारात निरनिराळ्या कंपन्यांचे रेडिमेड ज्यूस उपलब्ध असतात. मात्र हेच ज्युसेस तुमच्या लहान मुलांसाठी आणि तुमच्यासाठी अत्यन्त धोकादायक आणि हानिकारक आहेत.

हेही वाचा: नरेंद्र मेहतांवर काय कारवाई करणार ?
 
आपल्याला कायम वाटतं की बाजारात टेट्रापॅकमध्ये उपलब्ध होणारे ज्युसेस शुद्ध आणि स्वच्छ असतात. मात्र जरा थांबा, हे टेट्रापॅकमध्ये उपलब्ध असणारे ज्युसेस तुमच्या लहान मुलांसाठी अत्यंचत धोकादायक आहेत. जविला टेस्टी असल्याने लहान मुलांना नेहमीच अशा प्रकारचे ज्युसेस आवडतात. वेळेअभावी पालकांना ताज्या फळांचा रस त्यांच्या पाल्याला बनवून देणं शक्य होत नाही. म्हणून सहज उपलब्ध होणारे ज्यूस सेवन करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. फक्त ज्यूसच नाही तर सोडा आणि सॉफ्टड्रिंक्स यामुळेही लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. एक वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना अशाप्रकारचे ज्यूस देऊ नये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

काही आभ्यासकांच्यामते टेट्रापॅक ज्युसमध्ये ब्रोमिनेटेड वनस्पती तेल असतं, जे ब्रोमीन टॉक्सिन निर्माण करू शकतं. ब्रोमीन टॉक्सिनमुळे मुलांच्या मेंदूवरही दुष्परिणाम होऊ शकतो. यामध्ये कॅडमियम, कार्बेनिक, आर्सेनिक आणि मर्क्युरी यासारखे घटक असतात. त्यामुळे असा ज्यूस मुलांना दिल्यानं त्यांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मुलांच्या मेंदूचा विकास थांबू शकतो आणि कालांतरानं मुलं आजारी होऊ शकतात.

मोठी बातमी - 'जित'तर आज या जगात नाहीये, त्याचं #WhatsApp पाहून आई-बाबांच्या पायाखालची जमीन सरकली

मुलांना काय होऊ शकतं:

  • या ज्यूसमध्ये कॅलरीज्चं प्रमाण अधिक असतं.  
  • त्यामुळे मुलांना दाताच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • मुलांना गॅस किंवा पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.
  • लहान मुलांना डायरिया किंवा जंताचा त्रास होण्याची भीती असते.
  • हे ज्यूस अतिशय गोड असल्यानं लहान वयात मुलांना डायबीटीजचा धोका असतो.
  • हे ज्यूस घेतल्यामुळे लहान मुलांना भूक लागत नाही.

त्यामुळे लहान मुलांना बाजारातले टेट्रापॅक मधील ज्यूस देण्यापेक्षा घरी ताज्या फळांचा रस करून देणं अधिक चांगलं आहे.  

packed juice are bad for children health         


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: packed juice are bad for children health