
मुंबई : माणसातील अहंकार हीच मोठी समस्या असून, अहंकारमुक्तीतूनच सुखाची अनुभूती होऊ शकते, असा उपदेश आध्यात्मिक गुरू, लेखक, जागतिक कीर्तीचे वक्ते श्री एम यांनी केला. पूर्वी ज्ञानप्राप्तीसाठी जगभरातील लोक भारतात येत होते. आज आपण मात्र परदेशात जातो. जग जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी पुन्हा भारताकडे वळेल, तेव्हाच आपण विश्वगुरू होऊ आणि भक्ती-शक्ती एकवटली तरच हे साध्य होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.