esakal | आकाशातही ‘ही’ जोडी ठरली हिट
sakal

बोलून बातमी शोधा

आकाशातही ‘ही’ जोडी ठरली हिट

आकाशातही ‘ही’ जोडी ठरली हिट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : शहरात बच्चे कंपनीसह आबालवृद्धांनी पतंगबाजीला सुरुवात केली आहे. शहरात ठिकठिकाणी पतंगांचे स्टॉल उघडण्यात आले आहेत. आकाशात विहरणारे विविधरंगी पतंग सर्वांचेच लक्ष वेधू लागले आहेत; मात्र या वर्षी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या ‘जोडी नंबर १’ या पतंगाने विशेष लक्ष वेधले आहे; तसेच अन्य पक्षप्रमुखही पतंगावर झळकत आहेत. त्यामुळे या वर्षी आकाशातही राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. 

हे वाचा : वाढदिवशीच मुलीचा गुदमरुन मृत्‍यू!

भारतीय जनता पक्षाचे कमळ, शिवसेनेचा वाघ, काँग्रेसचा पंजा यांसारखी चिन्हे असलेले पतंग विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. पतंगांच्या खरेदीकरिता गेल्या दोन दिवसांपासून बाजारात गर्दी केली जात आहे. 

संक्रांतीच्या सणानिमित्त होणाऱ्या पतंगबाजीत आकर्षक पतंग बनविण्यासाठी व्यावसायिक सरसावले असून आकाशात झेपावणाऱ्या पतंगांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी; तसेच राजकीय पक्षांच्या छबी झळकू लागल्या आहेत. सध्या भाजप व महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सर्वत्र सुरू आहेत. त्यामुळे पतंगांच्या माध्यमातून कोण कोणाला हरवणार यासाठी शहरातील तरुणांमध्येही पतंग काटाकाटीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पतंगांवर झळकू लागले आहेत. मोदींच्या छबीने पतंगांवर जागा पटकावली असून, त्या पतंगांच्या खरेदीकरिता गर्दी होत आहे. 

हे वाचा :  ‘वाडिया’ला^जीवदान! 

नायलॉनच्या मांजाची छुपी विक्री 
प्लास्टिकबंदीमुळे यंदा बाजारात कापडी आणि कागदी पतंग दिसून येत आहेत. बाजारात ५० रुपयांपासून एक हजाररुपये किमतीचे पतंग उपलब्ध आहेत. नायलॉनच्या मांजावर बंदी असल्यामुळे सुतळी दोरा वापरून या वर्षी पतंग उडवण्याचा आनंद साजरा केला जाणार असला तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने नायलॉनच्या मांजाची विक्री केली जात आहे.

राजकीय समीकरणांची भरारी 
पतंगावरील अमित शहा आणि मोदींच्या काळ्या जॅकेटची; तसेच ‘दबंग’ स्टाईलमधील आक्रमक छबी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या रंगसंगतीशी सुसंगत पतंग बनविण्याची काळजीही घेतली गेल्याचे पाहावयास मिळत आहे.

महिलांची लगबग
मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिलावर्गाने मंगळवारी बाजारात गर्दी केली होती. तिळगूळ, हळदी-कुंकूसाठी लागणाऱ्या वस्तू यासह आकर्षक पतंगांच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. गोड-गोड बोलण्याचा संदेश देणाऱ्या कार्डसह तिळगुळाच्या वड्या, काळ्या साड्या, ड्रेस, हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती. सध्याच्या धावपळीच्या काळात तयार तिळगूळ,  साखर फुटाणे, चिक्की, रेवडी या पदार्थांना नेहमीप्रमाणे मागणी वाढली आहे. सध्या तिळगूळ १२५ ते १५० रुपये किलो, रेवडी १२५ रुपये, तिळाचे लाडू १८० ते २०० रुपये किलो दराने मिळत आहेत. 
 

loading image
go to top