
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील पलावा चौक हा वाहतूक कोंडीचे मुख्य जंक्शन आहे. येथील कोंडी फोडण्यासाठी देसाई खाडी व पलावा येथे नवीन पूल उभारण्यात येत आहे. अनेक वर्षापासून हे काम सुरू असून वारंवार पाठपुरावा करू ही अद्याप पुलाचे काम झाले नाही. यावरून मनसे नेते राजू पाटील यांनी सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन 31 एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे. असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?... की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटचा माध्यमातून पाटील यांनी उपस्थित केला आहे.