Palghar Assembly Election 2024 Result : इव्हीएम मतदानावरील वाढती शंका; पालघरमधील पाच उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज
EVM Machine: राज्यातील मतदारांत नाराजीचे वातावरण असताना अचानक महायुतीने मिळवलेला विजय कित्येक पटीने मोठा असल्याने एव्हीएम मतदानावर शंका घेतली जाऊ लागली आहे.
विरार- राज्यभरात महाविकास आघाडीची सत्ता येणार की,महायुती वर्चस्व राखणार याबाबत निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला समसमान कल वर्तवण्यात येत असतानाच निकालाच्या दिवशी मात्र महायुतीने न भूतो असा विजय संपादन करत राज्यात सत्तेत येण्याचा मार्ग सुकर केला.