Palghar Breaking: युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!

पालघर जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांच्या कडून त्याचे सुचनाचे पालन न झाल्याने ऐन मुख्य हंगामात शेतकऱ्यांना युरिया पासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराज व्यक्त केले आहे.
Palghar Breaking:  युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!
Palghar Breakingsakal

विनायक पवार - सकाळ

Urea Black Market : पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणूतील गंजाड मनिपुर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे.

पालघरच्या डहाणू तालुक्यातील गंजाड मनिपुर येथे युरिया खताचा काळा बाजार उघडकीस आला आहे. येथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले 60 पोती युरिया जप्त करण्यात आले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती दिली होती, ज्यामुळे कृषी विभागाने तातडीने कारवाई केली.

Palghar Breaking:  युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!
Ration Black Marketing: रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची छापा टाकून कारवाई

मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत घोरखना, रडका कलांगडा, लहानी दौडा, राजेश भुरभुरे आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी साफळा रचत ही घटना उघड केली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळेच युरियाचा काळाबाजार उघड झाला आहे. प्रतिसाद: स्थानिक शेतकऱ्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. कृषी विभागाने पुढील तपासणीसाठी सॅम्पल घेतले असून, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आल आहे.

पालघर जिल्यात गेल्या एक।महिन्या पासून युरिया खत उपलब्ध होत नसून खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या आहेत.

Palghar Breaking:  युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!
Palghar Politics: बहुजन विकास आघाडीच्या विरोधात संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर, वाचा इनसाईड स्टोरी

जिल्ह्यात पावसाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा अश्या सूचना काही दिवसापूर्वी कृषीमंत्र्यांनी दिल्या होत्या मात्र पालघर जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांच्या कडून त्याचे सुचनाचे पालन न झाल्याने ऐन मुख्य हंगामात शेतकऱ्यांना युरिया पासून वंचित राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराज व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात यंदा उशिरा पेरणी सुरू झाली आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पाऊस दडी मारून बसला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. खरीप पिकांची निगा राखण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले असताना. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना युरियाच्या कृत्रिम टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे.

"शेतकऱ्यांच्या मते, सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असली तरीही ग्रामीण भागात अशा प्रकारे काळाबाजार होत आहे. सरकारच्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Palghar Breaking:  युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!
Palghar Politics: बहुजन विकास आघाडीच्या विरोधात संभाव्य उमेदवारांची नावे आली समोर, वाचा इनसाईड स्टोरी

सरकारकडून युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत, परंतु अशा घटनांनी शेतकऱ्यांच्या समस्या वाढवल्या आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी गंजाड येथील गोडवाना मध्ये ठेवलेला युरिया ताब्यात घेतला असून पुढील डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम।सुरू आहे.

कृषी अधीक्षक पालघर

निलेश भागलेश्वर

"गेल्या वीस बावीस दिवसा पासून आम्हाला युरिया मिळत नसल्यांने आम्ही कृषी आधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिली होती त्याच्या कडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत होत नव्हती त्यामुळे आम्हला काळाबाजारातून जास्त पैसे मोजून युरिया खरेदी करावा लागत आहे. गंजाड मध्ये एका बोईसरच्या युरिया माफीयाच्या गोडाऊन वर्ती छापा टाकून मोठ्या प्रमाणात युरिया जप्त करण्यात आला आहे आता यावरती तरी दोषि आधिकाऱ्या वर्ती सरकारने यावर कठोर कारवाई करावी.

लाहानी दौडा

स्थानीक डहाणू

Palghar Breaking:  युरियाचा काळाबाजार पुन्हा उघड; कृत्रिम टंचाई भासवत सुरू होती लूट!
Palghar: दमदार पाऊस न झाल्याने पालघरमध्ये भीषण पाणी टंचाई, 88 गावांना टॅंकरद्वारे पुरवठा! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com