

Hindu girl college student forced to perform Namaz
ESakal
वाडा : तालुक्यातील पोशेरी येथे असलेल्या आयडियल फाऊंडेशन काॅलेजच्या फिजिओथेरपी अभ्यास क्रमाकरिता चार दिवसापूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी जबरदस्तीने अधिक्षिका व अन्य मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींनी नमाज पढायला लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या संदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आयडियल काॅलेजवर गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.