

Robbers looted jewellery shop in palghar
ESakal
पालघर : पालघर जिल्ह्यात दिवसाढवळ्या सोनाराच्या दुकानात दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवत तसेच हातात शस्त्र घेऊन तीन जणांनी सोन्याच्या दुकानातीळ सोनं पोत्यात भरल्याचे समोर आले आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून दुकानदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.