पालघरमध्ये पत्रकारावर गोळीबार; गोळी बरगडीत घुसली | Palghar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing

पालघरमध्ये पत्रकारावर गोळीबार; गोळी बरगडीत घुसली

पालघर : माजी नगरसेवक आणि पत्रकार जावेद लुलानीया (Journalist javed lulania) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना (Firing incident) मंगळवारी रात्री घडली. या घटनेत जावेद जखमी (injured) झाले असून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात (private hospital) उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: डोंबिवली : उच्छाद घालणारे माकड वन विभागाच्या ताब्यात

जावेद हे पालघर स्थानक रस्त्यावरील दुकानासमोर उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी जावेद यांच्या बरगडीत घुसली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी लुलानिया यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

काही तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. काही दिवसांपूर्वी पालघरमधील बॅनर तयार करणाऱ्या एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती.

loading image
go to top