

Palghar Illegal Call Center
ESakal
निखिल मेस्त्री
पालघर : पालघर शहरालगत असलेल्या सुंदरम शाळेजवळील एका इमारतीमध्ये बेकायदा कॉल सेंटरवर छापेमारी करून या कॉल सेंटरचा पर्दाफाश पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या कॉल सेंटर मधून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कॉल सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यासह काही लॅपटॉप आणि मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. मीरा रोड आणि भाईंदर अशा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कॉल सेंटरचे लोण आता पालघरमध्येही पसरू लागल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.