
Manor Latest News: नंदाडे उंबरपाडा आणि ३२ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी वरई-पारगाव रस्त्यालगत टाकलेले पाइप सार्वजनिक बांधकाम विभागाने उखडून टाकले, तसेच रस्त्याच्या नुकसानप्रकरणी कंत्राटदाराकडून दंड वसुली केली जाणार आहे. विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.
जलवाहिन्या टाकण्यासाठी वरई-पारगाव रस्त्यालगत विनापरवाना खोदकाम करून रस्त्यासह साइडपट्टीचे नुकसान करण्यात आले होते. सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कारवाईची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली होती.