
मुंबई : पालघर तालुक्यातील हत्याकांडात बळी पडलेला वाहनचालक नीलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना कांदिवली (पू.) येथील भाजप आमदार आणि राज्य महासचिव अतुल भातखळकर यांनी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
चालक नीलेश तेलगडेंच्या दोन लहान मुली आहेत. त्यांच्या कुटुंबातील कोणीही कमावते नसल्याने भातखळकर यांनी त्यांना अर्थसाह्य केले आहे, परंतु ती मदत पुरेशी नसल्याने सरकारने तेलगडे यांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य करावे, तसेच बळींना न्याय मिळावा यासाठी तपास तातडीने पूर्ण करून हा खटला विशेष न्यायालयात चालवून त्यात सरकार पक्षासाठी निष्णात वकील नेमावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत. तेलगडे कुटुंब कांदिवली येथेच राहत असल्याने भाजप कार्यकर्तेही या कुटुंबाला मदत करतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
सुशील गिरी महाराजांच्या गुरुबंधूंचे सुरत येथे देहावसान झाल्यामुळे त्या ठिकाणी जाण्याकरिता पोलिस परवानगीकरिता ते प्रयत्न करत होते. तरीही पोलिसांनी त्यांना आवश्यक त्या परवानग्या का दिल्या नाहीत, याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या गावात ही घटना घडली, त्या गावामधील नागरिक या घटनेच्या मागे होते त्यांची जात, पात, धर्म न पाहता सखोल चौकशी करून त्यांना शासन करण्याची मागणी त्यांनी केली. या हत्याकांडप्रकरणी कारवाई करत असताना राज्य सरकारने 48 तास वाया घालवण्याची अक्षम्य चूक केली. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांना या तपासापासून पूर्णपणे दूर ठेवावे; तरच ही चौकशी निष्पक्ष आणि खऱ्या अर्थाने वेगवान होईल, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Palghar massacre: Atul Bhatkhalkar's help to family of driver Nilesh
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.