esakal | Palghar: मोखाड्यात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी चे वर्चस्व
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी

मोखाड्यात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी चे वर्चस्व

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : पालघर जिल्हा परीषदेच्या पोटनिवडणुकीत मोखाडा तालुक्यातील आसे गटातून राष्ट्रवादीचे हबीब शेख तर पोशेरा गटातून शिवसेनेच्या सारीका निकम विजयी झाल्या आहेत. जिल्ह्यात कोठेही न झालेली शिवसेना- राष्ट्रवादी ची आघाडी मोखाड्यात झाल्याने याठिकाणी भाजपाचा धुव्वा उडाला आहे. यावेळी आमदार सुनिल भुसारा यांनी या विजयानंतर मतदारांचे आभार मानत या आघाडी बद्दल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.मोखाडा तालुक्यातील या दोन्ही जागा गत साली बिनविरोध निवडून येवून याठिकाणी पोशेरा मध्ये भाजप आणि आसे मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार होते. मात्र या पोटनिवडणुकीत भाजपाने हि जागा गमावली आहे.

            आसे मधून भाजपाचे उमेदवार जयराम निसाळ यांना  4 हजार  14  तर राष्ट्रवादीचे हबीब शेख यांना 5  हजार  675 मते मिळाला असुन  शेख  1 हजार  634 मतांनी विजयी झाले आहेत. मात्र यागटातील ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे एकुण चित्र होते. तर दुसरीकडे पोशेरा गटात मात्र शेवटच्या फेरी पर्यंत चुरशीची निवडणूक पहावयास मिळाली आहे. या गटात भाजपाच्या किशोरी गाटे यांना 3 हजार  986  मते मिळाली तर शिवसेनेच्या सारीका निकम यांना 4  हजार 313  मते मिळाल्याने सारीका निकम  327 मतांनी  विजयी झाल्या आहेत. मोखाडा तालुक्यातील या दोन्ही जागांवर शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी झाली होती.

हेही वाचा: वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला

असे गटातील पक्षनिहाय आकडेवारी

पक्ष उमेदवाराचे नाव मतदानसंख्या

राष्ट्रवादी हबीब शेख 5675 भाजप जयराम निसाळ 4014

मनसे निलेश फुफाणे 409

कॉंग्रेस सुरज शिंदे 376

------------------------------

पोशेरा गट

शिवसेना सारीका निकम 4313

भाजप किशोरी गाटे 3986

मनसे गायत्री दांडेकर 836

कॉंग्रेस हिरा पाटील 494

loading image
go to top