esakal | Palghar: वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेस

वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिलीप पाटील

वाडा : तालुक्यात आज झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला असून पाच जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला झेंडा फडकवला आहे. तर जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या एका जागेवर शिवसेनेला यश मिळाले आहे.भाजप,काॅग्रेस व मनसेला मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. 

वाडा तालुक्यातील आबिटघर गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्ती वलटे या निवडून आल्या आहेत.त्यांना 3679 इतकी मते मिळाली.तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार मेघना पाटील यांना 3658 मते मिळवून अवघ्या 21 मतांनी पराभव पत्करावा लागला.शिवसेनेच्या उमेदवार दिव्या म्हसकर यांना तिस-या क्रमांकावर जावे लागले. 

हेही वाचा: रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोघांना; हे आहेत मानकरी

जिल्हा परिषदेच्या गारगांव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी शेलार या प्रचंड मतांनी विजयी झाल्या असून त्यांना 6755 इतकी मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार निलम पाटील या 4913 मते मिळवून पराभूत झाल्या.रोहिणी शेलार हा 1842 इतक्या मतांच्या फरकाने विजयी झाल्याआहेत.जिल्हा परिषदेच्या पालसई गटात शिवसेनेच्या मिताली बागुल या निवडून आल्या आहेत. त्यांना 5329 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या धनश्री चौधरी यांना 4038 मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुगंधा पाटील यांना 3454 मतांवर समाधान मानावे लागले.जिल्हा परिषदेच्या मोज गटात शिवसेनेचेअरूण ठाकरे विजयी झाले आहेत. त्यांना 5495 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे अतिष पाटील यांना 4584 मते घेऊन पराभवाचा सामना करावा लागला.

जिल्हा परिषदेच्या मांडा गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अक्षता चौधरी या पुन्हा विजयी झाल्या आहेत. त्यांना 4114 इतकी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे राजेंद्र पाटील यांना 3768 तर शिवसेनेच्या सुवर्णा पाटील 3621 यांना पराभवाचा सामना करावा लागला.पंचायत समितीच्या सापने बुद्रुक गण यावेळी शिवसेनेने मनसेकडून हिसकावून घेतला आहे. शिवसेनेच्या दिष्टी मोकाशी या निवडून आल्या आहेत. त्यांना 2897 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मनसेच्या कार्तिकी ठाकरे यांना 2656 मते मिळवून पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर मुकावे लागले.

loading image
go to top