

विरार ता.(बातमीदार) : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या इनोव्हा गाडीचा आज (१ मे) सकाळी घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने रॉंग साईडने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि विरुद्ध दिशेने गाडगे चाल वण्याचा प्रश्न समोर आला आहे.