पालघर नगर परिषद क्षेत्रात 'या' तारखेपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन

प्रकाश पाटील
Wednesday, 12 August 2020

मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मनाई आदेशात म्हटले आहे. 

पालघर : पालघर नगर परिषद कार्यक्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुक्रवार 14 ऑगस्ट ते मंगळवार 18 ऑगस्टपर्यंत पाच दिवसांचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी लागू केला आहे.

अधिक वाचाः  'मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

पालघर नगरपरिषद क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे 442 रुग्ण बाधित झाले असून या कार्यक्षेत्रात संपर्कात आल्याने कोरोना झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. येत्या काळात संसर्ग अधिक वाढू नये म्हणून नगरपरिषद क्षेत्रात पाच दिवसाची संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र 14 ऑगस्टला पालघरमध्ये हुतात्मा दिवस साजरा करण्यात येत असल्याने आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असल्याने तो साजरा करण्यासाठी काही अटी शर्तींसह सूट देण्यात आली आहे.

BIG NEWS -  कोरोना चाचणीचे दर झालेत कमी, चाचणी झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर... 

या लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारची दुकाने, भाजी मंडई, मच्छी मंडई सर्व बंद राहतील. फक्त औषधाची व दुधाची दुकाने सुरू असतील. पालिका क्षेत्रातील सर्व औद्योगिक परिसर बंद असेल. पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्‍यक सेवांना पेट्रोल पुरवठा केला जाईल. मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मनाई आदेशात म्हटले आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

in palghar Municipal Council area once again lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in palghar Municipal Council area once again lockdown