
मोखाडा : मोखाडा नगरपंचायत हद्दीतील अंगणवाडीच्या इमारतींची दुर्दशा झाली आहे. बहुतांश अंगणवाडीच्या खिडक्या, दरवाजे मोडले असून अनेक इमारतींना गळती लागली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीत ''मी कसे शिकू आणि कसे खेळू" असे म्हणण्याची वेळ आता बाळगोपाळांवर आली आहे. या गंभीर घटनेकडे प्रशासनाने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याने बालक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.