पालघर पोलिसांचं मिशन ऑलआऊट; विविध गुन्ह्यांतील 12 आरोपींना अटक

Police
Police sakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पालघर पोलिसांकडून (Palghar Police) 31 डिसेंबरचं औचित्य साधून पालघर जिल्ह्यात मिशन ऑलआऊट (Operation all out) राबवण्यात आलं. यात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हवे असलेले 12 आरोपी पकडण्यात (Twelve culprit arrested) पोलिसांना यश आलं आहे. तर 97 वाहनधारकांवर मिशन दरम्यान कारवाई करण्यात आली आहे.

Police
ओमिक्रॉन बधितांसाठी हजार बेड्स आरक्षित; मुख्य रुग्णालयांसह जम्बो सेंटर सज्ज

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसावा, गुन्हेगारी नियंत्रणात यावी, तसंच 31 डिसेंबरच्या अनुषंगानं काही गैरकृत्य होऊ नये, यासाठी पालघर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मिशन राबवण्यात आलं. यात प्रामुख्यानं नाकेबंदी, कोंबींग ऑपरेशन, अडगळीच्या जागा शोधणं, संशयीत आणि रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करणं अशी कामं मिशन ऑलआऊटमध्ये करण्यात येतात.

त्यानुसार केलेल्या कारवाईत पालघर पोलिसांना 12 गुन्हेगार जे फरार होते, त्यांना शोधण्यात यश आलं, तसंच 113 रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. 5 दारुच्या अड्ड्यांवर छापे टाकून ते उद्ध्वस्त केले. तर मोटार वाहन कायद्यांतर्गत 97 वाहनचालकांवर कारवाई करत जवळपास 30 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी अशा पद्धतीची कारवाई खुप फायद्याची ठरते, अनेकदा खुप दिवस शोधूनही सापडत नसलेले आरोपी गुन्हेगार या मिशन दरम्यान पोलिसांना सापडतात. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मिशन ऑलआऊट सारखे उपक्रम राबवत असल्याचं पालघर पोलिसांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com