Palghar: रखरखत्या उन्हात विजेचा लपंडाव, १४ तास वीजपुरवठा खंडित; पालघरकर घामाघूम

Palghar Electricity Supply: पालघर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत चालला असून अशातच १४ तास येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली होती.
Palghar Power Supply Cut

Palghar Power Supply Cut

ESakal

Updated on

जव्हार : महाराष्ट्रात उन्हाचा पारा भयंकर वाढला आहे. अशात ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव काही कमी होत नाही. उष्णता एवढी वाढली आहे की, पंख्याशिवाय घरात बसणे कठीण झाले आहे. अशात मुंबई, ठाण्यासारख्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार, मोखाड्यात अद्याप २४ तास सलग वीजपुरठा मिळेल, अशी व्यवस्था नाही. मंगळवारी (ता. १२) तर तब्बल १४ तास येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com