Palghar News : रिलीफ रुग्णालय राडा! सहा जणांचा जामीन पुन्हा लांबणीवर, ‘म्हात्रे प्रकरणा’चा न्यायालयात संदर्भ

पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या २३ आरोपींपैकी सहा जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.
esakal

Palghar Case

Palghar Case

Updated on: 

पालघर - पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या २३ आरोपींपैकी सहा जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सोमवारी निर्णय अपेक्षित असताना डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द केल्याच्या घडामोडीचा संदर्भ पालघर न्यायालयात देण्यात आला. या पार्श्वभूमीवर न्यायालयात दोन्ही बाजूंकडून प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सहा आरोपींच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता. २९) निर्णय देण्याचे न्यायालयाकडून स्पष्ट केले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com