esakal | पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका

गडचिंचले हत्या कांडात साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह  १७ पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दोषी ठरविले असून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहे.

पालघर साधू हत्या प्रकरणी, ठाकरे सरकारची मोठी कारवाई; 17 पोलिस अधिकाऱ्यांना दणका

sakal_logo
By
संदीप पंडित


विरार - गडचिंचले हत्या कांडात साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह  १७ पोलिसांना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दोषी ठरविले असून त्यांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहे. यात फौजदार रवी साळुंके  व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी याना सक्तीने सेवा निवृत्त करण्यात आले आहे तर त्यांच्या बरोबरच इतर पोलिसांना कर्तव्यात कसुरी केल्या बद्दल दोषी  ठरविण्यात आले आहे. त्यांना वेगवेगळ्या  शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत 

संदीपसिंह आणि भाजपच्या संबधांबाबत चौकशी करण्याची सीबीआयला विनंती'; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

      16 एप्रिल 2020 रोजी मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची  डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलीस शिपायांना यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. दरम्यान गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

'खासगी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर रुग्णालय दरनियंत्रण प्रस्ताव रखडला'; भाजपची मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका

गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी नवी मुंबई येथील विशेष महानिरीक्षक चौकशी करत होते त्यांनी . चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांच्या सह जवळपास १५ पोलिसांना कर्तव्यत कसूर केल्या प्रकरणी दोषी ठरविले आहे यात त्यांनी आनंद काळे याना बडतर्फ इले आहे.  तर  सह फोजदार रवी सांळुखे आणि कान्स्टेबल नरेश धोडी याना सक्तीने सेवा निवृत्त केले आहे याच बरोबर पोलीस कटारे याना उपनिरीक्षक पदाच्या वेतन श्रेणीवर २ वर्षे तसेच  पोलीस हवालदार संतोष मुकणे यांनाही २ वर्षे मूळ श्रेणी वेतन श्रेणीवर ठेवण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वे ठरली जीवनवाहिनी; 11,400 टन जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक

तर पोलीस शिपाई शशिकांत कदम,सूरज कामडे ,मनोज सहारे याना शिपाईपदाच्या मुळ वेतन श्रेणीच्या  १ वर्ष ठेवण्यात येणार आहे. ,बाबासाहेब जगताप अक्षय पऱ्हाडे ,आकाश आराक, गणेश घागस, अमित कुमार, कमलाकर पाटील, सूरज होवाळे , इसराईल सययद, राहुल  पंडागळे , श्रीराम फाजगे याना मूळ पदाच्या वेतन श्रेणीवर ३ वर्षे ठेवण्यात येणार आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )