esakal | "उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या उपरण्याला इटलीचे काठ"
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

"उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या उपरण्याला इटलीचे काठ"

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्यात गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात दोन साधूंची पोलिसांसमोर ठेचून हत्या करण्यात आली. रात्रीच्या वेळी चोर समजून त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आज एक वर्ष झालं तरी अद्याप ठाकरे सरकारकडून साधू संतांना न्याय देण्यात आलेला नाही. उलट हत्याऱ्यांना आणि मारेकऱ्यांना वाचवण्याची एक खेळी खेळण्यात आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला तिलांजली देऊनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे आज सिद्ध झाले आहे. त्यांच्या हिंदुत्वाच्या उपरण्याला इटलीचे काठ आहेत याबद्दल आता आमच्या मनात कोणतीही शंका नाही, अशा शब्दात भाजपचे आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर टीका केली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: सावधान!! मुंबईसाठी पुढील १५ दिवस महत्त्वाचे; समजून घ्या कारण

"पालघरमध्ये मुलं चोरी करणारी टोळी फिरत आहे अशी अफवा परसली होती. त्या गैरसमजातून काहींनी त्या साधूंची हत्या केली असं सुरूवातीला उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पण माहिती अधिकारातून मिळालेल्या वृत्तानुसार २०१८पासून हत्येच्या दिवसांपर्यंत त्या भागात अशी कोणतीही तक्रार नव्हती. अशा परिस्थितीत कोणत्या आधारावर उद्धव ठाकरे यांनी अशा अफवा असल्याचे सांगितले. आणि जर अफवा असेल तर त्याचा तपास सीआयडीने का केला नाही? सीआयडीने तयार केलेली चार्जशीट अतिशय मोघम स्वरूपाची आहे. त्यामुळे माझा असा आरोप आहे की साधूंची हत्या करायची आणि त्याला अफवेचा अँगल द्यायचा हा जो मारेकऱ्यांचा प्लॅन होता, तो प्लॅन दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी यशस्वी केला", असा खळबळजनक आरोपही भोसले यांनी केला.

हेही वाचा: "संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाची नक्कीच नोंद ठेवेल"

"साधूंच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही आज पालघरला दिवा लावण्यासाठी जाणार होतो पण आम्हाला जाऊ दिलं नाही. असं नेमकं पालघरमध्ये काय दडलंय की राज्य सरकार आम्हाला शांततामय मार्गानेही तेथे जाऊन देत नाही. याचा असाच अर्थ होतो की पालघरचे लागेबांधे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची दोरी ही पालघरपर्यंत लटकलेली आहे. साधूसंतांना न्याय देण्याचे काम या सरकारने टाळले. त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधूंना न्याय नाकारला, त्यामुळे त्यांना वर्ष होण्याच्या आतच तळतळाट भोगावा लागला. आज या साधूसंताच्या हत्येचे वर्षश्राद्ध आहे. याच दिवशी सांगतो की लवकरच या सरकारचं तेरावं घालण्याची परिस्थिती येईल", अशा शब्दात आचार्य तुषार भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.

loading image
go to top