Palghar: वैतरणा नदीत वाहुन गेलेल्याचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधला !

Palghar: वैतरणा नदीत वाहुन गेलेल्याचा मृतदेह ग्रामस्थांनी शोधला !

Palghar Accident news: शहापुरहून घरी सावर्डे येथे भास्कर पादीर शनिवारी 7 सप्टेंबर ला परतत होते.
Published on

Latest Mokhada news: मोखाड्यातील वैतरणा नदीचा प्रवाह पार करताना, सावर्डे येथील भास्कर पादीर (45) हे नदीच्या प्रवाहात शनिवारी वाहुन गेले होते. स्थानिक ठिकाणी नदीपात्रात शोध घेऊनही पादीर आढळून आले नाहीत. दोन दिवस सावर्डे येथील ग्रामस्थ त्यांचा नदीलगत शोध घेत असताना, वैतरणा नदीपासुन सुमारे  20  ते  25  किलोमीटर अंतरावर मोडकसागर धरणाच्या परिसरात, भास्कर चा मृतदेह ग्रामस्थांनी शोधुन काढला आहे. 

                  शहापुरहून घरी सावर्डे येथे भास्कर पादीर शनिवारी  7  सप्टेंबर ला परतत होते. त्यावेळी वैतरणा नदीलगत तेथे काही शाळकरी मुलं नदीपार करण्यासाठी खोळंबली होती. त्यामधील रूचिता पवार या विद्यार्थीनीला खांद्यावर घेऊन, भास्कर पादीर वैतरणा नदीचा प्रवाह पार करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com