

Police investigating after the decomposed body of a 30-year-old woman was found inside a locked flat in Palghar following a three-day communication gap with her family.
Sakal
निखिल मेस्त्री
पालघर : तीन दिवस बहिणीशी संपर्क नसल्याने अखेर सुरतहून पालघरला पोहोचलेल्या भावाला बहिणीच्या घराच्या दाराला बाहेरून कुलूप दिसले. मात्र बंद दरवाजाच्या आतून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने त्याच्या मनातील भीती खरी ठरवली. कुलूप तोडून आत प्रवेश करताच बेडरूममध्ये ३० वर्षीय पूजा मिश्रा या महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आणि पालघर शहरातील जुन्या सातपाटी रोड परिसरात खळबळ उडाली.