
Teacher
पालघर : जिल्ह्यातील बाराशे कंत्राटी शिक्षकांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून थकले होते. दिवाळी तोंडावर असताना पगार नसल्याने शिक्षकांची अवस्था वाईट बनली होती. आता राज्य सरकारने पगारापोटी नऊ कोटींच्या जवळपासचा निधी मंजूर आणि वर्ग केला असला तरी सरकारी सुट्ट्यांमुळे शिक्षकांना पगार मिळणार नाही. त्यामुळे यंदा बाराशे शिक्षकांच्या घरची दिवाळी कोरडी आणि कर्जबाजारीची होणार आहे. दिवाळीनंतर हे पगार मिळणार असल्याने एकीकडे दिलासा मिळाला असला तरी वेळेत पगार न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर आहेत.