esakal | पालघर ZP निवडणूक: अध्यक्षपदी वैदही वाढाण, आघाडीचे मंत्री तळ ठोकून
sakal

बोलून बातमी शोधा

Palghar Election

पालघर ZP निवडणूक: अध्यक्षपदी वैदही वाढाण, आघाडीचे मंत्री तळ ठोकून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत (Palghar Zp Election) बंडखोरी होण्याच्या भीतीने महाविकास आघाडीचे तीन मंत्री आणि दोन खासदार यांनी पालघर मध्ये ठाण मांडल्याने या निवडणुकीत रंग भरले असले, तरी असे काही न होता आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी महाविकास आघाडीतीळ शिवसेनेच्या (Shivsena) वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड झाली . या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडले होते. तर सेनेत अध्यक्षपदासाठीही चढाओढ होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या(MVA Government) नेत्यांनी फिल्डिंग लावली होती.(Palghar ZP Election Vaidehi vadhan elected as president - nss91)

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली या निवडणुकीसाठी महाविकासआघाडी तून सेनेच्या वैदही वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर भाजपातर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले व उपाध्यक्षपदासाठी महेंद्र भोणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत भाजप काही लोकांना फोडून निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न करणार असे चित्र निर्माण झाले होते त्यामुळे गेल्या चार दिवसा पासून सेनेचे आमदार रवींद्र फाटक, आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा हे मोर्चे बांधणी करत होते.

हेही वाचा: ठाण्यातील 'छमछम'ला महापालिकेचा दणका, 'या' बारला ठोकले टाळे!

आज दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषदेची खास सभा आयोजित केली होती सभेच्या अध्यक्षस्थानी तथा पीठासन अधिकारी उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर होते निवडणुकीचे काम सुरू होताच भाजपाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले व सभात्याग करून भाजपाचे आठही सदस्य बाहेर पडले. आणि निवडणुकीत भरलेले सर्व रंग उडून गेले . यानंतर निवडणुकीच्या प्रक्रियेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी एक एक च उमेदवार असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी केली अध्यक्षपदी वैदही वाढाण तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सांबरे यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीसाठी तीन मंत्री उपस्थित होते. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे बांधकाम, मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,खासदार राजेंद्र गावित ,खासदार राजेंद्र विचारे , आमदार सुनील भुसारा ,आमदार विनोद निकोले ,आमदार राजेंद्र पाटील ,आमदार श्रीनिवास वनगा व आमदार रवींद्र फाटकयांचा समावेश होता.

loading image