पालघर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का

पारोळ ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील यांचा बविआ मध्ये प्रवेश
Palghar Politicians
Palghar Politicianssakal media

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी (palghar ZP) आणि जिल्ह्यातील पंच्यायत समित्यांच्या जागे साठी ५ ऑक्टोबरला निवडणूक (Elections) होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला असून पूर्वेकडील पारोळ ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील (Geeta Patil) व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra thakur), आमदार राजेश पाटील (Rajesh Patil), ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी खासदार बळीराम जाधव (Baliram jadhav) यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला.

Palghar Politicians
नारायण राणे यांनी प्रत्येक FIR साठी स्वतंत्र याचिका करावी- हायकोर्ट

वसई पंच्यायत समितीच्या दोन जागांसाठी हि पोट निवडणूक होत असून या दोन्ही जागा पूर्वपट्टीतील असून दोन्हि जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे हा शिवसेनेला बसलेला मोठा धक्का समजला जात आहे. येथील शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या गीता गुरुनाथ पाटील यांच्या समवेत गुरुनाथ गजानन पाटील, सोनू पाटील, यांनी बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात झाला. यावेळी वसई विरार शहर महानगर पालिकेचे माजी सभापती कन्हैया भोईर, जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, बहुजन विकास आघाडीचे बाळू घरत, कृपेश पाटील,अशोक पाटील, भिणार चे माजी उपसरपंच रुपेश पाटील, मयुर कुडु, विशाल पाटील,वैभव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com