

FDA Action Over Indirect Ads of 'Vimal Elaichi'; Mundhe Asserts Legal Responsibility of Endorsing Actors
Sakal
मुंबई : 'विमल इलायची'च्या नावाखाली प्रतिबंधित पान मसाल्याची अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरात केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या तिन्ही दिग्गज अभिनेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारणे दाखवा नोटीसला अखेर आपले लेखी उत्तर दिले आहे. मात्र, "तिन्ही अभिनेत्यांचे उत्तर आले असून, यावर योग्य वेळ आली की मी सविस्तर बोलेन," अशी सावध आणि सूचक प्रतिक्रिया एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.