

Pankaja Munde PA Wife
esakal
पंकजा मुंडेंचे वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचं लग्न झालं होतं. मात्र मुलीच्या कुटुंबाने हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली असून मुलीचे कुटुंब थेट वरळी पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.