पनवेलकरांसाठी खूशखबर! पालिका उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी 

दीपक घरत
Thursday, 17 September 2020

महापालिका हद्दीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचा निर्णय पनवेल पालिकेने घेतला असून, शुक्रवारी (ता.18) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिकेमार्फत या बाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पनवेल -  महापालिका हद्दीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचा निर्णय पनवेल पालिकेने घेतला असून, शुक्रवारी (ता.18) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिकेमार्फत या बाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

पालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नवीन पनवेल ( पुर्व ) सेक्टर 11 येथील भूखंड प्रशिक्षण केंद्राकरिता निश्चित करण्यात आला आहे. पालिकेमार्फत तयार करण्यात येणार असलेल्या या केंद्रात प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण संस्थेची नेमणूक करण्यात येणार असल्याने पनवेल मधून आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळाडू तयार करण्याचे काम ही संस्था करणार आहे.

'मी हरामखोर नाही, सगळ्यात जास्त मानधन घेणारी आभिनेत्री'! संजय राऊतांनी माफी मागावी, कंगनाची मागणी

पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण महासभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. ऑनलाईन झालेल्या पालिकेच्या या महासभेत पालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सभागृहात महापौर, आयुक्त, उप महापौर तसेच पालिका अधिकारी उपस्थित राहणार आहेत तर पालिका सदस्य असलेल्या नगरसेवकांना आपल्या कार्यालयातून ऑनलाईन सभेला उपस्थित राहता येणार आहे.

क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी पालिकेचा 92 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पालिकेमार्फत उभारण्यात येणार असून, या खर्चातून 29 हजार 899 चौ.मी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर मैदान विकसित करण्यासोबत कुंपण बांधणे, तसेच 486 चौ.मी परिसरात खेळडून साठी चेंजिग रूम, स्वछतागृह,प्रशिक्षण खोली, प्रेषक बसू शकतील अशी व्यवस्था असलेली इमारत तयार केली जाणार आहे.

मोठी बातमी : संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, म्हणालेत...

भारतीय क्रिकेट संघात 100 सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या क्रिकेट पट्टूच्या संस्थेची केली जाणार निवड पालिके मार्फत उभारण्यात येणार असलेल्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघात 100 कसोटी अथवा एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या क्रिकेट पट्टूच्या संस्थेची निवड केली जाणार असल्याची अट पालिके मार्फत ठेवण्यात आली आहे.तसेच संस्थे कडे 7 वर्ष संस्था चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे.

इतर अटी 

  • 9 वर्षाच्या कालावधी करता संस्थेची निवड 
  • संस्थेने 10 ते 19 वर्षाखालील 100 अथवा प्रशिक्षणार्थींच्या संख्येच्या 10 टक्के खेळाडूंना दर वर्षी विनामूल्य प्रशिक्षण देणे गरजेचे.
  • मैदान तसेच इमारतीच्या दुरुस्ती तसेच देखभालीचा खर्च संस्थेने करणे आवश्यक 
  • संस्थेने अकादमीत पालिका हद्दीतील 50 टक्के खेळाडू,25 टक्के रायगड तर राज्यातील 25 टक्के खेळडून करिता जागा ठेवणे आवश्यक असणार आहे.
  • संस्था मैदानाच्या देखरेखी करिता 6 ग्राउंड मेन ची नेमणूक करेल 

क्रिकेट मैदान व पॅव्हेलियन च्या देखभालीचा वार्षिक खर्च 1.5 कोटी इतका अंदाजित पकडण्यात आला असून, हा खर्च संस्थेने करायचा आहे त्या करिता संस्थेला प्रायोजक,तसेच सी आर एस फंड गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.तसेच क्रिकेट स्पर्धा भरवून अथवा क्रिकेट स्पर्धे करिता मैदान उपलब्ध करून संस्थेला निधी उभारता येणार आहे.

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panvel corporation will set up an international standard cricket academy