Crime News: भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; बेपत्ता मुलीचा मृतदेह घरातील बॅगेतच सापडला, जवळचा व्यक्ती आरोपी निघाला

Raigad Crime News: लहान मुलांच्या भांडणाचा राग एका व्यक्तीने चिमुकलीवर काढला आहे. त्याने लहान मुलीची निर्दयीपणे हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Crime
CrimeESakal
Updated on

पनवेल: तळोज्यातील देवीचा पाडा येथील राहत्या घरासमोरून मंगळवारी भरदुपारी अपहरण झालेल्या अडीच वर्षांच्या हर्षिका शर्मा या चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरातील बाथरूमच्या माळ्यावर एका बॅगेत आढळून आला. हर्षिकाची हत्या तिच्या घरासमोर राहणाऱ्या मोहम्मद मजीर वझीर अन्सारी (वय २९) याने केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com