Panvel News: पनवेलच्या नानोशीत भूकंपाचा सौम्य धक्का, पाच किमीपर्यंत जाणवले हादरे

Panvel Earthquake : पनवेल तालुक्यातील नानोशी गावाजवळ भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने केले.
Panvel Earthquake

Panvel Earthquake

Esakal

Updated on: 

अलिबाग : पनवेल तालुक्यातील नानोशी गावाजवळ शनिवारी (ता. ३) सायंकाळी ४.३२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता २.६ रिक्टर स्केल इतकी नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. जवळपास पाच किमी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com