

Panvel-Karanjade traffic jam
ESakal
नवीन पनवेल : पनवेल ते करंजाडे मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या आता भीषण स्वरूप धारण करत आहे. केवळ पाच मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा वेळ लागत असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.