पनवेलमध्ये ‘प्रसूती मृत्यू’ शून्य होणार; महापालिका व MGM रुग्णालयाचा पुढाकार

Panvel Municipal Corporation
Panvel Municipal CorporationSakal

पनवेल : प्रसूती दरम्यान महिलांचे होणारे मृत्यूचे (women's delivery death) प्रमाण रोखण्यासाठी पनवेल महापालिका (Panvel municipal corporation) आणि एमजीएम रुग्णालयाचे (MGM Hospital) संचालक डॉ. सुधीर कदम यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही संस्थांतर्फे प्रसूती मृत्यू शून्य मोहीम सुरू केली जाणार आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसर, दुर्गम भागातील आदिवासी वाड्या, शहरातील झोपडपट्ट्या (slum) आणि गावठाणांमधील महिलांचे प्रसुतीदरम्यान होणारा मृत्यू नियंत्रणात आणले जाणार आहे.

Panvel Municipal Corporation
विकसनशील भारतातील 'या' गावात आजही नाही रस्ता ; मातेने बाळाला दिला डोलीतच जन्म 

जगभरात विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही बाळाला जन्म देण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत शेकडो महिलांना मृत्यू झाल्याचे आकडे समोर आले आहेत. जगात दरवर्षी ३ लाख महिलांचा गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतर होणाऱ्या समस्यांमुळे मृत्यू होतो. अमेरिकेत दरवर्षी ७०० महिलांचा मृत्‍यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अहवाल दिला आहे की जगभरात दररोज सुमारे ८३० महिलांचा मृत्यू होतो. यापैकी बहुतांश स्‍त्रिया (९९ टक्के) गरीब, विकसनशील देशांमध्ये राहतात. ही गंभीर बाब लक्षात घेत एमजीएम रुग्णालयाचे संचालक डॉ. सुधीर कदम यांनी महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात रोज ३० पेक्षा जास्त मातांचे मोफत प्रसूती करून दिली जात आहे. तसेच आता लवकरच पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने एक हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. प्रसुतीच्या वेदना होत असणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क करता येणार आहे. हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिका संबंधित महिलेच्या घरी पोहोचून तिला तत्काळ रुग्णालयात पोहचवेल. रुग्णालयात एमजीएम रुग्णालय तसेच पनवेल महापालिकेतर्फे संबंधित मातेची तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुखरूप प्रसूती केली जाईल.

Panvel Municipal Corporation
एसटीची नोकरी गेली; आता पुन्हा कामाचा शोध

पनवेल महापालिकेतर्फे हेल्पलाईन तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय हेल्थ कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे. सध्या हेल्पलाईनला मंजुरी मिळालेली नाही. हेल्पलाईन क्रमांकाला मंजुरी मिळाल्यानंतर हा कायमस्वरूपीचा क्रमांक असेल, त्यावर महिलांना संपर्क करता येईल.

- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

देशाने आज सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. विज्ञानात नवनवीन क्रांती आणि संशोधन केले जात आहेत. तरी प्रसूती सारख्या नैसर्गिक क्रियेत मातांचा जीव जातो. ही बाब मनाला न पटणारी आहे. त्यामुळे आम्ही पनवेल महापालिकेसोबत संयुक्त विद्यमाने प्रसूती मृत्यू शून्य ही मोहीम सुरू करत आहोत.

- डॉ. सुधीर कदम, संचालक, एमजीएम रुग्णालय समूह

माताबाल संगोपन रुग्णालय ठरणार संजीवनी

पनवेल महापालिकेतर्फे सायन-पनवेल महामार्गालगत खांदेश्वर येथे तब्बल दोन एकरावर भव्य रुग्णालय उभारण्यात येत आहे. रुग्णालयात सुमारे ३८० खाटांचे नियोजन आहे. रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेतर्फे ११७ कोटी खर्च केला जाणार आहे. हे रुग्णालय शहरातील महिला आणि लहान मुलांसाठी विशेषत्वाने कार्यरत राहणार आहे. प्रसूती, स्‍त्री रोग, लहान मुलांचे आजार, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग, लहान मुलांवरील शस्‍त्रक्रिया आदी विविध दर्जेदार सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला सर्व साधारण सभेची मंजुरी मिळाली असून लवकरच आर्थिक खर्चालाही मंजुरी मिळणार आहे. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल शहराचे हक्काचे पहिले रुग्णालय होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com